चार वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर संत एकनाथ नाट्य रंगमंदिर उद्घाटनासाठी सज्ज!

2022-01-25 8

औरंगाबाद शहरातल्या पहिलं नाट्यगृह म्हणजे संत एकनाथ रंग मंदिर. तब्बल चार वर्षांनंतर नाट्यगृहाचा पडदा मंगळवारी उघडणार आहे. या नाट्यगृहाची दुरावस्था प्रसिद्ध सिने कलावंत प्रशांत दामले यांनी सर्वांसमोर आणली. त्यांच्यासोबत स्थानिक कलाकारांनीही नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी चळवळ उभारली. त्यानंतर महापालिकेने यावर तब्बल आठ कोटी रुपये खर्च केले. आज या रंगमंदिराचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद करांची संस्कृतिक भूक भागवण्यासाठी तयार केलेलं हे नाट्यगृह कसं आहे याचा आढवा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...

Videos similaires