धर्मेंद्र प्रताप सिंग यांचा समाजवादी पक्षात प्रवेश
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश
धर्मेंद्र प्रताप सिंग यांची ८ फूट २ इंच इतकी उंची
भारतातील सर्वात उंच माणूस असा दावा करणाऱ्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी काल समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सपासाठी ही सकारात्मक बाब असल्याचं बोललं जातंय. धर्मेंद्र प्रताप सिंग यांची ८ फूट २ इंच इतकी उंची असून ते प्रतापगड जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत. अखिलेश यादव यांच्या विचारांनी प्रभावित होऊन समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी दिली.
#tallestmanindia #dharmendrapratap #dharmendrapratapsingh #samajwadiparty #samajwadipartynews