आज २३ जानेवारी, २०२२, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. उत्तम वक्तृत्व, मराठी माणसाचं दमदार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे बाळासाहेब. अगदी अंडरवर्ल्डलाही यांच्या नावानं धडकी भरायची. याच बाळासाहेबांनी भाषणांमधून जसे विरोधकांवर टीकेचे बाण सोडले, तसेच त्यांनी व्यंगचित्रातूनही राजकीय नेतेमंडळी, सरकारी धोरणांवर निशाणा साधला. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पाहूयात त्यांनी काढलेली काही खास अन् गाजलेली व्यंगचित्रं