महावितरणच्या ठेकेदारांकडून ३ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या काम बंद आंदोलनात ठाणे, भांडुप, नवी मुंबई परिमंडळ क्षेत्रातील कामगार सहभागी झाले आहेत. बिलाची रक्कम मिळत नाही तो पर्यंत एकही कामगार कामावर परतणार नसल्याचं संघाकडून सांगण्यात आलयं. गेल्या ६ महिन्यांपासून महावितरण कडून थकीत बिले न दिल्याने आणि महावितरण कडून कुठलही उत्तर मिळत नसल्याचे ठेकेदार संघाकडून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ओवेंडम आणि इंफ्रामेंट कंपनीत ठाणे, भांडुप, नवी मुंबई परिमंडळ क्षेत्रात जवळपास १८ हजार ठेकेदार आहेत. प्रत्येक ठेकेदाराची ६ महिन्यांची लाखो रुपयांची बिलं थकीत आहेत. आमचा न्यायनिवाडा करावा अशी विनंती उर्जा मंत्री आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत पाठवून ठेकेदारांनी केली आहे.