Nanded News Updates l मुलीच्या लग्नातील खर्च टाळून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला निवारा l Sakal

2022-01-22 851

Nanded News Updates l मुलीच्या लग्नातील खर्च टाळून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला निवारा l Sakal

अर्धापूर (जि. नांदेड) ः पुणे येथील भोई प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना मदतीचा हाथ देत आहे. याच भोई प्रतिष्ठानच्या डॉ. मिलिंद भोई यांनी आपल्या मुलीच्या लग्नात होणारा खर्च टाळून त्याच पैशातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी निवारा उभा करून दिलाय. अर्धापुर शहरातील लक्ष्मी साखरे यांच्या पतीने नापिकीमुळे आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुली असून घरात कुणी कर्ता पुरुष नाही. या कुटुंबाला राहायला साधे घर देखील न्हवते. हे पाहून भोई प्रतिष्ठाच्या मिलिंद भोई यांनी लक्ष्मीबाई साखरे यांना पक्क्या स्वरूपाचा घर बांधून दिले असून, त्यांच्या कन्येच्या विवाहानंतर नवदांम्पत्याच्या उपस्थितीत या घरात गृहप्रवेश सोहळा होणार आहे.

#NandedNewsUpdates #NandedLiveUpdates #Nanded #FarmerSuicide #Pune #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires