जळगावात जल्लोषात साजरा केला 'गुरु' नावाच्या घोड्याचा वाढदिवस

2022-01-20 46

एखाद्या घोड्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला असं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. पण हो, हे खरं आहे. घोड्याला घरातला सदस्य मानून जळगावातील धनगर कुटूंबियांनी गुरु नावाच्या घोड्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केलाय. या अनोख्या वाढदिवसाची जळगावात एकच चर्चा रंगलीय. जळगाव शहरातील गोपाळपुरा येथे ज्ञानेश्वर धनगर हे कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा वैभव याच्या वाढदिवशीच त्यांनी चंद्रपूरहून घोडा खरेदी केला. या घोड्याचं नाव त्यांनी गुरू ठेवलं. गुरूच्या पालनपोषणात त्यांनी कसलीही कसर ठेवली नाही. सात वर्षांच्या गुरूला त्यांनी दोन पायावर चालत नृत्याचही प्रशिक्षण दिलं. तब्बल शंभर ते दोनशे मीटरपर्यंत दोन पायावर चालणाऱ्या गुरूला लोक आश्चर्याने पाहतात. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Videos similaires