काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याने राज्यात भाजप आक्रमक झाली आहे. जळगावात भाजपतर्फे नाना पटोलेंचा निषेध व्यक्त करण्यात आला. पटोलेंच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आलं. तसेच त्यांचे प्रतिमेचे दहन केले. नाना पटोले हाय हाय च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. भाजप कार्यालयापासून टॉवर चौकापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं.