पुण्यातून अपहरण झालेला चिमुकल्याचा १८ दिवसानंतर लागला शोध

2022-01-19 533

बावधन परिसरातून 1 जानेवारी रोजी अपहरण झालेला चार वर्षाचा मुलगा पुनावळे परिसरात बुधवारी दुपारी सुखरूप मिळाला आहे. अपहरण केलेल्या व्यक्तीने त्याला पुनावळे परिसरातील लेबर कॅम्प येथे सोडून दिले होते. या मुलाची माहिती मिळताच पोलीस आणि नातेवाईक त्याला घेऊन आले आहेत. बावधन येथील हाय स्ट्रीट परिसरातून पायी जात असताना स्वर्णम सतिश चव्हाण या ४ वर्षाच्या मुलाचं एका व्यक्तीने अपहरण केलं होतं. स्वर्णव याला स्कुटीवरून नेतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. या घटनेनंतर चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची नोंद करण्यात आली होती आणि पुणे पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतला जात होता. सोशल मीडियावरुन देखील मुलाच्या तपासाबाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. अखेर आज या तपासाला यश आलं आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires