एके काळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. जशी शहराची व्याप्ती वाढत गेली, तसं शहरात मोटर वाहने वाढायला सुरुवात झाली आणि २ पेडेल ची सायकल धूळ खात पडायला लागली. पुणेकरांनी मोटर सायकल ला पसंती दिली आणि पुणे आता मोटार सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते.
अश्यातच सायकलिंग हे कुठल्या वयावर आणि इतर गोष्टींवर अवलंबून नसून मानसिकतेवर अवलंबून आहे, असे पुण्यातील हे साठीपार असलेले तरुण सांगतायत. संजय कट्टी व विजय हिंगे यांनी कोलकत्ता ते कन्याकुमारी असा २९०० किमी चा प्रवास अवघ्या २५ दिवसात पार केला.
स्वामी विवेकानंद जयंतिनिमित्ताने पुण्यातील यंग सिनियर्स या सायकल क्लबच्या या दोन सदस्यांनी ही मोहीम पूर्ण केली. १३ डिसेंबरला हावरापासून मोहीम सुरू केली. मोहिमेअंतर्गत पूर्व किनारपट्टीच्या बाजूने उत्तर- दक्षिण असे दोघांनी २९०० किलोमीटर अंतर २५ दिवसांत पार केले. म्हणजे सरासरी रोज ११५ किमी अंतर पार केले.
मोहिमेचा मार्ग पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू - कन्याकुमारी असा होता. यंग सिनियर्स हा उत्साही सायकलप्रेमींचा ग्रुप आहे. ग्रुपचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक आहेत.
#cycling #cycle #health #kolkatatokanyakumari #cycletour