नाना पटोले प्रकरणात आता अमृता फडणवीसांचीही एंट्री

2022-01-18 215

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरात गोंधळाचे वातावरण आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तर नाना पटोले यांच्या अटकेची मागणी होत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या प्रकरणात उडी घेत त्यांच्या खास शैलीत नाना पटोलेंना टोला लगावला आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले!”अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना सुर्याची उपमा देत नाना पटोलेंना टोला लगावला आहे. यासोबत त्यांनी नरेंद्र मोदींच्या कार्याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. नाना पटोले रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारा येथे गेले होते. त्यादिवशी त्यांच्या निवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी विविध सभा घेतल्या. याच वेळी मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे नाना पटोले म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Videos similaires