वर्ध्यात आरोग्य विभाग झोपेत? पोलिसांना अजूनही अहवालाची प्रतिक्षा

2022-01-17 21

वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणात संतापजनक घडामोड समोर आलीय. चार दिवस उलटूनही पोलिसांना अजून वैद्यकीय अहवालच प्राप्त झालेला नाही. वैद्यकीय विभागाकडून या प्रकरणी अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र रुग्णालयात चालणाऱ्या गैरकारभारासंदर्भात आरोग्य विभागाची कोणतीही तक्रार नाही. कदम रुग्णालयाच्या मागील बाजूस गॅस चेंबरमध्ये 12 कवट्या, 54 हाडे आढळून आली होती. वैद्यकीय विभागाच्या ढिम्मपणामुळे अवैध कामाला खतपाणी मिळत असल्याची चर्चा आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.