शिवसेना आणि राणे वादानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर अध्यक्ष निवडीनंतर दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो हटवण्यात आले होते. त्यामुळे हा वाद काही थांबायचे नाव घेत नाही असे चित्र आहे. त्यात आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राणेंचे थेट नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे. अध्यक्षांच्या दालनातून कोणाचे फोटो हटवले, यापेक्षा वंदनीय बाळासाहेबांचा फोटो तेथून हटवण्यात आला हे दुर्दैवी आहे. याची नोंद सिंधुदुर्गातील आणि राज्यातील लोक घेतली. त्यामुळे याबाबत मला फार काही बोलायचे नाही. ही कशा प्रकारची प्रवृत्ती असू शकते याचा मात्र प्रत्यय आलेला आहे, असे सामंत म्हणाले.