नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकरसंक्रांत. लोहरी, बिहु, पोंगल अशी अनेक नावं या सणाला दिलेली आहेत. भारतीय लष्करातील जवानांनी बारामुल्ला जिल्ह्यातील एलओसीवर मकरसंक्रांत साजरी केली आहे. या व्हिडिओत भारतीय जवान पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यावेळी जवानांनीही केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी भारतीय जवानांचं 'खुकुरी' नृत्य सोशल मीडयावर व्हायरल झालं होतं.