भास्कर जाधवांनी गाडीचे स्टेअरिंग घेतले हातात; पाहिल्यानंतर सारेच झाले अवाक्

2022-01-11 23

कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना आमदार भास्कर जाधव पाहायला मिळाले आहेत. परंतु चक्क बस चालवितानाच भास्कर जाधव यांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या चालकाच्या जागेवर चक्क चिपळूणचे आमदार भास्कर जाधव बसले होते आणि ते स्वत: ही बसच चालवत होते. हे सारे पाहिल्यानंतर सारेच अवाक् झाले. भास्कररावांनी अचानक बस का चालवली, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, 'माझ्या एका जवळच्या सहकाऱ्याने व्यवसायासाठी नवी बस घेतली. आज ती मला दाखविण्यासाठी घेऊन आला असता गाडीची पूजा केली, हार चढवला, श्रीफळ वाढवला. आणि स्टेअरिंगचा ताबा घेऊन चिपळूण शहरातून फेरफटकाही मारला.'

Videos similaires