नाशिक ः त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परीषद शाळेतील चार-सहा नव्हे तर तब्बल साठहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहितात. एका हाताने इंग्रजी, दुसऱ्या हाताने मराठी.. अन अशा वेगवेगळ्या विषयांचे एकाच वेळी लिखाण करतात. विद्यार्थी आठवी पर्यंतचे पण ८११ पर्यंत पाढे सहज तोंडपाठ आहेत. पायाभुत सुविधांमागे न धावता गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केशव गावित या शिक्षकाने घेतलेल्या परीश्रमांचे फलीत झाल्याची जाणीव या विद्यार्थ्यांकडे बघून निश्चित होते. (व्हिडीओ : केशव मते, अरुण मलाणी)
#nashik #nashiknews #trimbakeshwar #ambidextrous #ambidextrousstudents