पुणे: कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून एका गाण्यातून मास्कबाबत प्रबोधन केलं जात आहे. गाण्याच्या माध्यमातून कोरोनाविरूद्धचा जागर करण्यासाठी पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी हे गीत तयार केले आहे.
#masksong #pune #usemask #mask #coronavirusawareness