करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहे. जवळपास एक वर्षांपासून लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे. याचमुळे अनेक ठिकाणी बोगस लसीकरणाच्या घटना देखील घडल्या आहेत. मुंबईच्या धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. विशेष म्हणजे कोविन या सरकारी संकेतस्थळावरही या बनावट प्रमाणपत्राची नोंद होत होती. त्यामुळे या आरोपीने अशा प्रकारे किती जणांना ही बनावट प्रमाणपत्र दिली आहेत याचा पोलिस आता शोध घेत आहेत. याप्रकरणी एका सायबर कॅफे मालकाला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. कसं चालत होत रॅकेट पाहणार आहोत व्हिडीओच्या माध्यमातून...