अभिनेत्री अक्षया देवधरनं बहिणीच्या लग्नात वेधल्या साऱ्यांच्या नजरा

2022-01-06 381

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच अक्षयाने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा तिने परिधान केला आहे. यासोबतच अक्षयाने आपल्या हातावर सुंदर मेहंदी काढत हिरवा चूडासुद्धा घातला आहे. अक्षयाने हा साजशृंगार आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. अक्षया सध्या झी मराठीवरील 'हे तर काहीच नाही' या शोमधून पडद्यावर परतली आहे.