छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी आहे. तीच्या अदांवर लाखो लोक फिदा असतात. श्वेताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले आहेत. साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. श्वेताच्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत. 'कसौटी जिंदगी की', 'कॉमेडी सर्कस का नया दौर', 'बेगूसराय' यांसारख्या मालिकांसाठी श्वेता तिवारी ओळखली जाते. याशिवाय ती 'बिग बॉस सीजन 4'ची विजेती होती. श्वेता तिवारीने याआधीही साडीवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सर्वच फोटोंमध्ये श्वेता अधिकच खुलून दिसत आहे.