इथं लोक एकदा लस घ्यायला घाबरतात अन् बिहारमधील एका 84 वर्षीय आजोबांनी एक, दोन, तीन नव्हे तब्बल 11 वेळा लस घेतली आहे. ब्रह्मदेव मंडळ असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. आजोबांच्या दाव्याने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे आजोबा बिहारमधील मधेपूरा जिल्ह्यातील ओराई येथे राहतात. आजोबांना लसीचा बारावा डोस घेताना पोलिसांनी अटक केली. ते लसीकरणासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक देत होते, तरीही अशाप्रकारची घटना घडल्यामुळे देशभरात आश्चर्य व्यक्त केले जातयं. 11 महिन्यात वेगळवेगळ्या ठिकाणी त्यांनी 11 लसीचे डोस घेतले आहेत. आजोबांना कारण विचारलं असता काय म्हणाले तुम्हीच ऐका..!