कोरोनाचा विस्फोट! राज्यातील आज 18 हजार 466 नवे कोरोनाबाधित

2022-01-04 63

राज्यात आज 18 हजार 466 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आज 75 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 653 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. मुंबईत आज 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. मंगळवारी 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Videos similaires