जालना : शहरातील टांगा स्टँड येथे मंगळवारी (ता.चार) जुन्या वादातून झालेल्या मारहाणीला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणल्याने सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बाजारपेठा पुन्हा सुरू झाली आहे.