समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला असून केंद्रीय गृहखात्याने त्यांची मुदतवाढ नाकारली आहे. समीर वानखेडे यांची बदली झाली असेल तरी त्यांचा विषय संपलेला नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. समीर वानखेडे यांनी केलेल्या फ्रजीवाडा सिद्ध होईल, त्यांच्या बदलीबाबत केंद्राने योग्य निर्णय घेतला. माझ्या विरोधात जर कोणी तक्रार देत असेल तर त्यावरही तपास व्हावा असंही नवाब मलिक म्हणाले.