बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. दिग्दर्शक एकता कपूरसह अभिनेता जॉन अब्राहम कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. दिग्दर्शक एकता कपूरने पोस्टमध्ये लिहिले, 'सर्व नियमांचे पालन करून देखील मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी प्रकृती ठिक आहे. मी सर्वांना विनंती करते की माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी.'अभिनेता जॉन अब्राहमने पोस्टमध्ये लिहिले, 'तीन दिवसापूर्वी मी एका व्याक्तीच्या संपर्कात आलो होते, मला नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. माझी पत्नी प्रिया आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच क्वारंटाईन झालो आहोत. दोघांनीही लस घेतली आहे. आम्हाला सैम्य लक्षणं आहेत. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्कचा वापर करा.' अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.