गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रोन चे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात ओमायक्रोन या विषाणूचा समूह संसर्ग होण्यास सुरूवात झाली असल्याने रुग्ण संख्या अधिक वाढण्याचा धोका आहे आणि चिंतेचे कारण बनू शकते. याच धर्तीवर काल राज्य शासनाने नवे निर्बंध जाहीर केले. मुंबईसह पुण्यात देखील ओमायक्रोनच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात तर तब्बल ९०० रुग्ण पुणे शहरात आढळून आले, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
काल देखील राज्यात ओमायक्रोनचे ८५ रुग्ण आढळून आले. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलंय.
ओमायक्रोन चा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आली असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली आहे त्याचरोबर त्यांनी काळजी करण्याचं कारण नसल्याचं देखील सांगितल आहे.