भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करावी अशी मोदींची इच्छा होती; पण...

2021-12-30 417

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्यावरून अनेक वेळा चर्चा झाल्या होत्या. २०१४ साली तर विधानसभेत राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देखील दिला होता. भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव आला होता. त्यावेळी आम्ही नकार कळवळा होता. तरीही राष्ट्रवादी भाजप एकत्र येण्याबाबत विचार करावा अस सांगण्यात आलं होतं. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त लोकसत्ता तर्फे अष्टावधानी या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

#SharadPawar #GirishKuber #NarendraModi #BJP #NCP