मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. कोरोनाच्या आकडेवारीत आज (बुधवारी ) कमालीची वाढ होताना दिसत आहे. आज थेट 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मंगळवारच्या (29 डिसेंबर) तुलनेत ही आकडेवारी कमालीची वाढलेली आहे. मंगळवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 1,377 होती. ज्यामध्ये मोठी वाढ होऊन आज 2 हजार 510 रुग्ण समोर आले आहेत. कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना फोफावतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.