Akola : जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला सुनावले

2021-12-29 2

#DistrictPlanningCommitteeMeeting #BJP #BachchuKadu #MaharashtraTimes
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीला अकोल्याचे पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे हे बोलण्याच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा पिंपळे हे नियोजन भवनात बोलत असताना त्यांची जीभ घसरली. मूर्तिजापूर तालुक्यातील पाणी योजनेच्या मुद्यावर भाजपचे आमदार हरीश पिंपळे बोलत होते. तेव्हा त्यांनी महिलांबद्दल अपशब्द काढले. तेव्हा पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना भर सभेत सुनावलं. मी अशी भाषा यानंतर सभेत सहन करणार नाही, बोलतांना भान ठेवलं पाहिजे. आपण भर सभेत बोलत आहोत,ही भाषा यापुढे मी खपवून घेणार नाही असें बच्चू कड़ू म्हणाले

Videos similaires