#SanjayRaut #AjitPawar #WinterSession2021 #CmUddhavThackeray #MaharashtraTimes
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली, अशी कौतुकाची पावती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिवेशनावर पूर्ण लक्ष आणि नियंत्रण होते. अधिवेशनकाळात विधानसभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिसत होती. त्यांनी टोले घेत, टोले देत ही जबाबदारी निभावली. अजित पवार यांनी दोन लगावले, चार घेतले, पण एकूणच अधिवेशन व्यवस्थित पार पडले, असे संजय राऊत यांनी म्हटले.