#12Family #HinduReligion #Hinduism #NathTemple #MaharashtraTimes
पैठण येथील नाथमंदिरात १२ कुटुंबातील ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करत विधीवत हिंदुधर्मात घरवापसी केली होती.मात्र कालपासून या धर्मांतर सोहळ्याबाबत वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी केलेल्या दाव्याने धर्मांतर सोहळ्याल्या नवीन वळण लागल आहे.पैठण शहरात कोणतेही धर्मांतर झालेले नसल्याचा खुलासा सुयश शिवपुरी यांनी केला आहे.धर्मांतर झालेल्या लोकांचा सत्कार आणि देवदर्शनचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा दावा सुयश शिवपुरी यांनी केला आहे.तर, नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी १२ कुटुंबातील ५३ जणांनी विधीवत हिंदुधर्म स्विकारला असल्याचा दावा केला होता.