Shirdi : मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्याने सरकारमधील ५०-६० आमदार नाराज?

2021-12-28 5

#CmUddhavThackeray #MLA #MaharashtraTimes
विधानसभेच्या अध्यक्षपदावरून रणकंदन पेटलेलं असतानाच महाविकास आघाडीचे ५० ते ६० आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा माजी मंत्री आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. शिर्डीत साई दर्शनानंतर बावनकुळे यांनी संवाद साधला आणि जोरदार टीका केली. विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतलं. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्य सरकारला आवजी मतदानाचा कायदा आणण्याची गरज का पडली? गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारचे ५० ते ६० आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. १६ महिने मुख्यमंत्री भेटत नाहीत, त्यांची कामे होत नाहीत आणि त्यामुळेच आमदार नाराज असल्याचं ते म्हणालेत.

Videos similaires