जळगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंनी स्थानिक शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत आत्महत्येचा इशारा दिला. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद चिघळला असताना थेट त्यांनी सभागृहात तक्रार केली. राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या विरोधात सतत कट कारस्थान रचले जात असून, आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अस झालं तर त्याला खडसे परिवार जबाबदार असणार आहेत असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील याबाबत विधानसभेत काय म्हणाले पाहा...