स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या वढु बुद्रुक येथे हे जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार आहे. शिवाय महाराजांची समाधी असलेल्या तुळापूर गावचा आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास राज्य शासनामार्फत हाती घेण्यात येणार असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं. हे स्मारक कसं असेल यासंदर्भातील माहितीही देण्यात आली आहे.