कामावर रुजू करून घेण्यासाठी महिला चढली झाडावर; बीडमधील स्वछता कर्मचारी महिलेचं आंदोलन

2021-12-27 230

बीड नगरपरिषदेमधील स्वच्छता कर्मचारी महिला झाडावर चढून आंदोलन करत आहे. अनिता बचुटे असं या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून थकीत वेतनाचा जाब विचारल्याने कंत्राटदाराने या महिलेला कामावरून काढून टाकले. कंत्राटदाराने महिलेशी संवाद साधताना अश्लील भाषा वापरून शिवीगाळ केल्यामुळे त्याच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी महिला तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे. मात्र शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे आंदोलनासाठी महिला झाडावर चढली. यापूर्वीही या महिलेने अशाप्रकारे झाडावर चढून आंदोलन केले होते.

Videos similaires