#NiteshRane #SantoshParabAttackCase #Shivsena #MaharashtraTimes
कणकवलीत वातावरण चांगलचं तापलं आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी मुख्यसुत्रधार म्हणून नितेश राणेंचं नाव पुढे केल्याचं म्हटलं जात आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या दबावापोटी पोलीस मुख्य सुत्रधाराचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत.असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे .हल्लाप्रकरणी पोलीस प्रशासन जनतेला कारवाईबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचंही नाईक यांनी म्हटलं आहे.आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली.