#SharadPawar #StateGovernmet #CmUddhavThackeray #MaharashtraTimes
राज्य सरकार स्थिर ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सातारा दौऱ्यावर असताना म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली आहे असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात, असा टोलाही शरद पवारांनी लगावला. त्यांनी याआधीही अशा प्रकारची विधानं केली आहेत. त्याची अशी विधाने महाराष्ट्रातील सामान्य लोक गांभीर्याने घेत नाहीत. त्याचा काहीही फायदा होत नाही. असं सांगत त्यांनी जास्त महत्व देण्यास नकार दिला.