#DistrictBankElections #MlaVaibhavNaik #SantoshParabAttackCase #MaharashtraTimes
शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा अशी मागणी करण्यात आली. तर जिल्हा बँकेचे बेपत्ता मतदार असलेल्या प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या अशी मागणीही करण्यात आली. यावेळी तपासी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन देण्यात आले