#EknathShinde #WinterSession2021 #MaharashtraTimes
सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले जोरदार सामने हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. 26 डिसेंबर रोजी रविवार असल्याने अधिवेशनाला सुट्टी होती. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. येत्या काही महिन्यात निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे
निवडणुकीच्या काळात देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे अशीच फटकेबाजी करून विरोधकांना घाम फोडतील अशा चर्चांना आता उधाण आले आहे. ठाणे महापलिकेचे स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या फाउंडेशनच्या वतीने नगरसेवक चषक २०२१ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले होते