#Fire #Fireवrigade #GeetaiTentHouse #MaharashtraTimes
मेहरुणमध्ये अनेक वर्षांपासून बंद गोडाऊनला भीषण आग लागली होती. या आगीत भंगार साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दल वेळेवर पोहचल्याने नुकसान टळलं. तब्बल अर्ध्या तासापर्यंतच्या या आगीत गोडाऊनमधील भंगार तसेच मोठ्या प्रमाणावर असलेल्या चारा जळून खाक झाला आहे. गीताई टेंट हाऊसचे अनेक वर्षांपासूनचे बंद गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये कचरा तसेच अनेक भंगार वस्तू होत्या. त्याला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केलं होतं. अग्निशमन बंब वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आल्याने कुठलेही नुकसान झालेले नाही