मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई कडे येणारा मक्याचा ट्रक पलटी झाला. बोरघाटात मुबंईकडे येताना खोपोली एक्झीट जवळ मक्याचा ट्रक पलटी झाला. ट्रकमधील सर्व मके रस्त्यावर पसरल्याने काही काळ वाहतुक खोळंबली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. खोपोली पोलीसांनी सदर ट्रक बाजूला करुन वाहतुक सुरळीत केली.