उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्गात पहिल्यांदाच दौरा होता. खडसे-चंद्रकांत पाटील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची यांनी प्रश्न विचारला असता राजकीय संघर्ष असल्यास आरोप प्रत्यारोप कशाप्रकारे होतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार नसून अपक्ष आमदार आहेत. काय बरोबर आणि काय चुकीचं आहे याबाबत पोलिस तपास करतील. प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देणं हे पोलिस विभागाचं काम आहे. यावर उद्या आम्ही सभागृहात बोलू, शिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील बोलतील. काही तथ्य असल्यास यावर बोलू असं ते यावेळी म्हणाले.