आमची मागणी मान्य झाल्याचं समाधान; पंतप्रधानांच्या निर्णयाचं राजेश टोपेंनी केलं स्वागत

2021-12-26 165

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ २५ डिसेंबर रोजी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केलंय. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्वागत केले आहे. आम्ही गेले कित्येक दिवस ही मागणी करत होतो आणि अखेर ही मागणी मान्य झाल्याचं समाधान आहे, अशा भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Videos similaires