राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. २४ डिसेंबर २०२१ रोजी सभागृहात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटीच्या विलीनीकरणाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. "अजित पवारांना हे बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही कोर्टाची लढाई लढत आहोत. आम्ही अजित पवारांना महाराष्ट्रात फिरणे कठीण करू.", असा इशारा आझाद मैदान येथे आंदोलनास बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
#STEmployee #AjitPawar #maharashtra #protest