#WeatherUpdate #Rain #MaharashtraRain #MaharashtraTimes
राज्यात एकीकडे कडाक्याची थंडी पडलीय. आता मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी चक्क डिसेंबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. राज्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस पडू शकतोय. 27 डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो
तर 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद,जालना,जळगाव,गोंदिया,भंडारा वर्धा नागपूर,अकोला,अमरावतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेलीय