#RamdasKadam #WinterSession2021 #MaharashtraVidhansabha #MaharashtraTimes
खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर ठाकरे सरकारकडून कारवाईत दिरंगाई होत असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार रामदास कदम यांनी शुक्रवारी स्वपक्षाला घरचा आहेर दिला. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील कलहामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.