अधिका-यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की लोकांना एकत्रित करण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या \"हर घर दस्तक\" लसीकरण मोहिमेमुळे लोकांना कोविड 19 लस घेण्यास प्रवृत्त करण्यात यश आले आहे आणि लसींच्या व्याप्तीला चालना देण्यासाठी उत्साहवर्धक परिणाम दिसून आले आहेत.