गरमा गरम वडापाव अथवा अन्य तळलेली खाद्यपदार्थ आता या पुढे वर्तमानपत्राच्या कागदामध्ये गुंडाळून देता येणार नाही. कारण, वर्तमानपत्र छपाई करताना वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये आरोग्यासाठी घातक असे केमिकल असते. गरम खाद्यपदार्थ पेपेरमध्ये गुंडाळल्यास त्या पेपरची शाई विरघळते व ती खाद्यपदार्थाला लागून पोटात जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे म्हणणे आहे.
#fastfood #pune #newspaper #wadapav #streetfood #packing