#AnilKapoorBirthdaySpecial #AnilKapoor #BollywoodNews #MaharashtraTimes
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि चिरतरूण अभिनेता आणि निर्माता अनिल कपूर यांचा आज 65वा वाढदिवस आहे.अनिल कपूर केवळ त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि फिटनेससाठी ओळखले जातात.त्यांच्या शाही जीवनशैलीमुळेही अनिल कपूर खुप चर्चेत असतात.सध्या प्रसिद्धीचा आणि यशाचा शिखर गाठलेल्या या अभिनेत्याने स्ट्रगलही तितकाच केला आहे.एकेकाळी अनिल कपूर यांना गॅरेजमध्ये राहावे लागले होते.वास्तविक, अनिल कपूर यांना सुरुवातीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते.आता अनिल कपूर एक यशस्वी व्यक्तिमत्त्व असून मुंबईतील जुहूमध्ये राहतात.तेथे त्यांचा आलिशान असा बंगला आहे.अनिल कपूर पत्नी सुनीता कपूर, मुलगी रिया कपूर आणि मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत ते राहतात.