मास्क न वापरणाऱ्या आमदारांवर चिडणाऱ्या अजित पवारांचे नगरसेवकच दिसले मास्कशिवाय

2021-12-23 355

राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरणाऱ्या आमदारांना खडे बोल सुनावले. करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मास्कचं महत्व पटवून देताना अजित पवार यांनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन करोना परिस्थितीसंदर्भात किती गांभीर्याने विचार करतायत याचा दाखल देत विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेखही केला. दुसरीकडे पुण्यात मात्र त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांना मास्कचं गांभीर्य नसल्याचं चित्र दिसून आलं. पुणे महापालिकेत झालेल्या सर्व साधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकसह सर्वच पक्षाचे नगरसेवक मास्क न वापरताच कामकाजात सहभागी झाले होते.

Videos similaires