कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने 'वजीर' सुळका सर करत बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली

2021-12-22 202

भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. बिपिन रावत यांना कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरकडून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रात चढाईसाठी कठीण समजल्या जाणाऱ्या आसनगाव इथल्या माहुली किल्ल्याजवळील 'वजीर' सुळक्यावर चढाई करत, सुळका सर करत बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. या सुळका चढाई मोहिमेत वयाची पन्नाशी पार केलेल्या गिर्यारोहकांनी सुद्धा सहभाग घेतला होता.

Videos similaires